December 23, 2024
3d-animation-career-course-after-12th

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ॲनिमेशन, गेमिंग, 3D क्षेत्राला खूप (3D Animation Career) महत्त्व प्राप्त झालं आहे. दिवसेंदिवस या क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. यामुळे या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे बारावीनंतर तुम्ही पारंपारिक शिक्षण क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर मल्टिमीडिया अँड अनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता आणि यामध्ये तुम्ही चांगला रोजगार मिळवू शकता. मल्टिमीडिया अँड अनिमेशनचे शिक्षण कसे घेता येईल, असा प्रश्न पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठो उपयुक्त आहे. जाणून घ्या 3D Animation क्षेत्रातल्या करिअरच्या संधीविषयी…

मुंबई – पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये D Animation कोर्स सहज उपलब्ध होतो. पण प्रत्येकजण मुंबई पुण्यात जाऊन कोर्स करू शकतो असे नाही. या धर्तीवर आता औरंगाबाद शहरातील देवगिरी (3D Animation Career) महाविद्यालयात ‘बी हूक मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन’ हा कोर्स सुरू झाला आहे. हा कोर्स 3 वर्षांचा असून यासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. या कोर्ससाठी 30 विद्यार्थ्यांची एक बॅच केली जाते.

कोर्सची फी किती? 

मल्टी मीडिया अँड ॲनिमेशन या क्षेत्राचे महत्त्व वाढत असल्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये या (3D Animation Career) कोर्सची फी 1 ते दीड लाखांपर्यंत आहे. मात्र औरंगाबाद शहरामध्ये सुरू झालेला हा कोर्स 12, 285 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हा कोर्स करून स्वतःचं करिअर घडवता येऊ शकते. SC कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –

TC ओरिजनल
10 वी मार्कशीट
जातीचा दाखल
नॉन क्रिमिलियर
आधार कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
पासपोर्ट साईज फोटो

अशा आहेत जॉबच्या संधी – (3D Animation Career)

या क्षेत्रात ग्राफिक डिझायनर
व्हिडिओ एडिटिर
मल्टीमीडिया डेव्हलपर
गेम डेव्हलपर
गेम डिझायनर
कॅरेक्टर डेसिग्नेर्स
की फ्रेम एनिमेटर्स
कॅमेरा ऑपरेटर
थ्रीडी मॉडेलर्स
3D अनीमेटर
2D अनिमेटर
लेआऊट आर्टिस्ट्स
लायटिंग आर्टिस्ट
टेक्चर आर्टिस्ट
कॉन्सेप्ट आर्टीस्ट
VFX आर्टिस्ट
स्क्रिप्ट राईटर
डिजिटल पेंटर
वेब डिझायनर
प्रोडक्शन डिझायनर
कंपोसीटर अशा विविध संधी उपलब्ध आहेत.
एडव्हर्टायझिंग, टीव्ही, चित्रपट, ऑनलाइन, प्रिंट मीडिया, कार्टून प्रोडक्शन, ई-लर्निंग, व्हिडीओ गेम इ. ठिकाणीसुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही Freelancer, Fiverr किंवा Upwork सारख्या फ्रीलान्सींग प्लॅटफॉर्म वर फ्रीलान्सिग करून देखील पैसे कमावू शकता.

किती मिळतो पगार?

हा कोर्स केल्यानंतर सुरूवातीलाच 35,000 ते 40,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. शिवाय (3D Animation Career) भत्ते सुद्धा मिळतात. तसेच या क्षेत्रात देशाबाहेर नोकरीची संधी उपलब्ध आहे. ज्यामध्ये जपान, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंग्डम आणि साऊथ कोरिया या देशात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

देवगिरी महाविद्यालय संपर्क –

अधिकृत वेबसाईट – deogiricollege.org
संपर्क क्र. 0240-2367336, 2367411 किंवा 07588643449
E-Mail – rahul.mohite888@gmail.com आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *