Pune PMC Recruitment 2022 | महापालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. लिपीक आणि अभियंता पदाच्या एकुण ४२५ जागांसाठी पुढील आठवड्यात जाहीरात काढली जाणार आहे. संपुर्ण राज्यात या भरती प्रक्रियेची परीक्षा होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Recruitment 2022)
महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता संपुष्टात आल्यानंतर प्रशासक राज सुरु झाले आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी महापालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांची माहीती मागविण्यात आली होती. या माहीतीच्या आधारे रिक्त पदांची संख्या निश्चित केली गेली. ही भरती प्रक्रीया कशी करावी यासंदर्भातही विचार केला जात होता. परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला काम द्यावे याविषयी प्रशासनाकडून चर्चा केली जात होती. ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या केंद्र सरकारच्या कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. महापालिकेतील लिपीक, अभियंता आणि अग्निशमन दलातील रिक्त पदांची भरती प्रक्रीया पुढील आठवड्यापासून सुरु होईल. या पदांची जाहीरात पुढील आठवड्यात काढली जाणार आहे. (Pune PMC Recruitment 2022)
सुमारे सव्वाचारशे पदांची भरतीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.
किती शहरात परीक्षा केंद्र करायचे हे अर्जाच्या संख्येवर ठरणार आहे.
नागपुर,औरंगाबाद, मुंबई या शहरांबरोबर इतरही शहरात परीक्षा केंद्र करावे लागण्याची शक्यता आहे.
पाचशे परीक्षा केंद्र तयार करावी लागतील असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.