Railway Apprentice Recruitment 2022 | सरकारी नोकरी करण्यास इच्छूक असणा-यासाठी एक महत्वाची माहिती आहे. उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR-RRC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. याबाबत (Railway Apprentice Recruitment-2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
पदे – एकूण जागा – 5,636 (शिकाऊ उमेदवार)
- फिटर-वेल्डर (G&E)
- इलेक्ट्रिशियन, सुतार
- डिझेल मेकॅनिक
- मशिनिस्ट
- पेंटर
- टर्नर
- रेफ्रिजरेटर
- एसी मेकॅनिक
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- मेसन,
- प्लंबर,
- लाइनमन
- माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (शिकाऊ उमेदवार )
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी परीक्षा अथवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50 टक्के गुणांसह शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
- नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.
- नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक –
- Resume (बायोडेटा)
- 10 वी, 12 वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये SC/ST/PWD/महिलांसाठी – शुल्क नाही.