तुम्ही जर नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लवकरच 70 हजार पदांवर भरती करणार आहे. हि भरती सरकारी नोकरीतील खुप महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. यामुळे बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. रोजगाराकडे सकारात्मक दृष्टीने चालणारे हे पाऊल म्हणता येईल
या संदर्भात बोलताना 14 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवर लवकरच भरती केली जाईल. (ssc recruitment 2022 of 10 lakh people by the Government in mission mode in next 18 months)
याच वेळी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 10 लाख पदे रिक्त असल्याच्या खुलासा करण्यात आला होता. ज्यासाठी पंतप्रधानांनी 18 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. या अंतर्गत सर्व भरती १८ महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे.
यावर बोलताना एसएससीने म्हटले आहे की, नवीन भरतीची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकारमध्ये गट ब आणि त्याखालील पदांवर भरतीसाठी परीक्षा घेते. हा आयोग देशभरातील स्पर्धा परीक्षांद्वारे उमेदवारांची निवड करतो आणि नंतर त्यांना केंद्राच्या विविध विभागांकडे पाठवतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 10 लाख भर्ती 18 महिन्यांत करायच्या आहेत, त्यापैकी बहुतांश भरती गट ब आणि त्याखालील आहेत, त्यामुळे या भरती पूर्ण करण्याची जबाबदारी एसएससीची आहे.
मात्र प्रश्न असा आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन 18 महिन्यांत भरती करेल का? उत्तर जाणून घेण्यासाठी, SSC चा ट्रॅक रेकॉर्ड समजून घ्या.
सएससीचा ट्रॅक रिकॉर्ड (SSC Recruitment Records)
एसएससीच्या वेबसाइटवर भरतीचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला जातो. सन 2020-21 मध्ये SAC ने 15 भरती परीक्षा घेतल्या, ज्यामध्ये 42,41,728 तरुणांनी परीक्षा दिली. 2020-21 मध्ये फक्त 5 भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या. यामध्ये 68,891 उमेदवारांची निवड करण्यात आली.
वर्ष 2019-20 मध्ये SSC ने 18 भरती परीक्षा घेतल्या, ज्यामध्ये 61,54,723 उमेदवार बसले होते. 18 रिक्त पदांपैकी फक्त 3 भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि अंतिम नियुक्तीसाठी 14,594 उमेदवारांची निवड करण्यात आली. तर 2018-19 मध्ये SSC ने 10 भरती परीक्षा घेतल्या ज्यामध्ये 36,81,155 उमेदवार बसले. या वर्षी फक्त 5 भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्यापैकी काही 2017-18 च्या देखील होत्या. 2017-18 आणि 2018-19 मध्ये 16,729 उमेदवारांची निवड करण्यात आली.
18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या
भरती पूर्ण करण्याच्या बाबतीत कर्मचारी निवड आयोगाचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. जर एसएससीने वेग वाढवला नाही, तर 18 महिन्यांत नियुक्तीचा दावा केवळ दावा म्हणून राहील. एसएससीचे काम केवळ कर्मचार्यांची निवड करणे असले तरी त्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते, काही वेळा सरकारी उदासीनतेमुळे आणि निष्काळजीमुळे निवड झालेल्या उमेदवारांनाही नियुक्ती मिळत नाही.