January 14, 2025 12:54:39 PM
CBSE Class 10 Result

प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE बोर्डाचा इयत्ता 10 वी चा (CBSE RESULT 2022) निकाल आज दिनांक 4 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी CBSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर पाहता येणार आहे. देशभरामध्ये लाखो विद्यार्थी दरवर्षी CBSE तून दहावीची (CBSE RESULT 2022) परीक्षा देत असतात. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाची प्रचंड उत्सुकता असते. यंदा देशभरातील 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता निकाल जाहीर करण्याची मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

निकाल उशीरा लागण्याची कारणे ‘ही’ आहेत (CBSE RESULT 2022)

CBSE च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन गुण (Internal Assessment Marks) वेळेत अपलोड करणं अत्यावश्यक होतं. परंतु, अनेक शाळांनी इंटर्नल गुण अपलोड केले नाहीत. तसंच काही शाळांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये त्रुटी असल्याचं म्हटलं होतं. या सर्व तक्रारींचा सीबीएसईकडून तपास करण्यात आला. या प्रक्रियेला (CBSE RESULT 2022) वेळ लागल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला असून यासाठी उशीर लागला आहे. पण आता 4 जुलै रोजी निकाल घोषित करण्यात येईल. याशिवाय सीबीएसई 12वीचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

असं असेल निकालाचं प्रमाण –

यंदाच्या वर्षी दोन्ही सत्रांचा निकाल 50:50 मार्किंग स्किमच्या आधारावर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पहिल्या सत्राची परीक्षा होम सेंटरवर झाली होती. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. ही बाब लक्षात घेऊन सीबीएसईने होम सेंटरवर झालेल्या (CBSE RESULT 2022) निकालाचं प्रमाण कमी करून 30 टक्के इतकंच केलं आहे. त्यामुळे या वर्षी पहिल्या सत्रातील 30 टक्के आणि दुसऱ्या सत्रातील 70 टक्के असे गुण गृहित धरले जाणार असल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे. याच कारणामुळे यंदाच्या वर्षी निकाल लागण्यासाठी उशीर लागला आहे.

स्कोर कार्ड ‘असे’ करा डाउनलोड –

  1. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
  2. Cbse.gov.in आणि cbresults.nic.in या वेबसाइटवर जा.
  3. होमपेजवर CBSE Class 10 Result या लिंकवर क्लिक करा. (CBSE RESULT 2022)
  4. विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक (Registration Number) व आसन क्रमांक (Roll Number) टाका.
  5. त्यानंतर स्क्रीनवर स्कोअर कार्ड पाहता येणार आहे.
  6. भविष्यात याचा उपयोग व्हावा म्हणून स्कोअर कार्डची प्रिंट काढून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *