December 23, 2024
Diksha Dinde success story

पुण्याची दीक्षा दिंडे… जन्मापासून (Diksha Dinde success story) तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. ती 84 टक्के अपंग आहे. मात्र तरीदेखील तिने हार न मानता स्वत:चा प्रवास सुरु ठेवला. ती जगभरात ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘व्हीलचेअर गर्ल’ म्हणून देखील ती प्रसिद्ध आहे. आता दीक्षानं अजून एक मोठं यश मिळवलं आहे. ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची ती मानकरी ठरली आहे. ‘चेवनिंगची’ मानाची स्कॉलरशीप तिला मिळाली आहे. स्वत:च्या पायावर उभी न राहू शकणाऱ्या दीक्षाने स्वप्नपुर्तीच्या दिशेने उंच झेप (Diksha Dinde success story) घेतली आहे. दीक्षा उच्च शिक्षित आहे. पुण्यात ती स्पर्धा परिक्षेची तयारी करते. प्रशासनात काम करण्याचं तिचं स्वप्न आहे.

“…कोण कुठली ही दीक्षा; ब्रिटिश सरकारच्या स्कॉलरशिपची मानकरी ठरली” (Diksha Dinde success story)

दीक्षानं फेसबुक पोस्ट करत आपला आनंद साजरा केला आहे. तिनं पोस्ट करत म्हटलंय, “कात्रजच्या सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी कोण कुठली ही दीक्षा, आज ब्रिटिश (Diksha Dinde success story) सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी ठरली आहे. आता बरोबर 24 तास होतील रिझल्ट हातात येऊन. परंतु अजूनही ही बातमी पचवायला जड जातेय. चेवनिंगच्या interview दरम्यान एक प्रश्न विचारला गेला. तुझ्या व्यक्तिमत्त्वावर ज्या व्यक्तींचा प्रभाव आहे अशा ‘लीडर्स’ बद्दल बोल. उत्तर देताना तोंडातून फक्त दोन व्यक्तींची नावे पडली. एक सावित्रीमाय, जिच्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ शकतोय आणि दुसरी म्हणजे माझी आई. जिने कधीच हार मानून माझी साथ सोडली नाही. हे उत्तर कोणाला convince करण्यासाठी नव्हतंच मुळी. काल रिझल्ट लागल्यावर आईकडे बघून जे समाधान मिळालय अथवा तिने काय कष्ट घेतलेत, ते मी कोणत्याच शब्दात (Diksha Dinde success story) सांगू शकत नाही. ‘पुणे महानगरपालिका कात्रज 94 जी’ इथून तिच्या कडेवर बसून सुरू झालेल्या या प्रवासाने मला खूप उंच उडण्याची दिशा दाखवली”; असं दीक्षा म्हणते.

संयुक्त राष्ट्र संघाची ‘ग्लोबल युथ अँबेसिडर’- (Diksha Dinde success story)

वस्तीतील मुलाचं शिक्षण, अपंग मुलांच्या मासिक पाळी या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची ‘ग्लोबल युथ अँबेसिडर’ म्हणून तिची निवड झाली.

व्हीलचेअरवरून दिले स्वावलंबनाचे धडे

पुण्यातील वस्तीतील मुलाचं शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या आणि मासिक पाळी या सगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2016 मध्ये संयुक्त (Diksha Dinde success story) राष्ट्र संघाची ‘ग्लोबल युथ अँबेसिटर’ म्हणून तिची निवड झाली. तिने आणि काही सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली. सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला. स्वत: व्हीलचेअरवर असताना सगळ्या मुलांना ती स्वावलंबनाचे धडे ती देत होती.

अपंगत्वामुळे अनेक समस्यांचा करावा लागला सामना (Diksha Dinde success story)

अपंगत्वामुळे तिला अनेक ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अनेकांचे बोलणे ऐकावे लागले मात्र ती खचली नाही. कॉलेजच्या सहलीत अपंगत्वामुळे तिला डावलण्यात आलं होतं. मात्र (Diksha Dinde success story) त्यानंतर तिने जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. ती स्वत:ला ‘गर्ल ऑन व्हील्स’ नाही तर ‘गर्ल ऑन विंग्ज’ म्हणते. तिच्या या प्रवासाची आजपर्यंत अनेकांनी दखल घेतली आहे.

पाय नसताना देखील स्वप्नांच्या दिशेने उडू शकते

तुमचे विचारच तुमच्या आयुष्याची वाट ठरवतात. जी मुलगी आईच्या मदतीशिवाय घराच्या बाहेरसुद्धा निघू शकत नाही तिच मुलगी आज अनेक देशांमध्ये ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून जाते यावर माझा देखील विश्वास बसत नाही. माझ्या आईवडिलांना माझ्यासारखं अपंग मुल जन्माला आल्याने त्यांनादेखील अनेकांनी त्रास दिला मात्र (Diksha Dinde success story) त्यांच्याच सहकार्यामुळे आज मी पाय नसताना देखील स्वप्नांच्या दिशेने उडू शकते. माणसाने जगत आणि जगवत रहावं. ध्येयाकडे वाटचाल करताना अनेकांना सोबत नेता येईल का? याचा विचार करावा, असं ती अभिमानाने सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *