December 23, 2024
startup-trend-in-india-sppu-seed-fund

आजकाल देशात स्टार्टअपचा मोठा ट्रेंड दिसून येतो आहे. आपल्या (Startup Trend) नवनवीन आयडियासोबत अनेक जण ‘StartUp’ सुरु करायचा विचार करत आहेत. देशातील अनेक स्टार्टअप्स यशस्वीही झाले आहेत. मात्र स्टार्टअप सुरु करायचं म्हंटलं की यासाठी लागतं प्रचंड भांडवल. सगळ्यांकडेच स्टार्टअप सुरु करण्यासाठी पैसे असतीलच असं नाही. पैसे नसल्यामुळे अनेक बिझिनेस आयडिया सुरूच होऊ शकत नाहीत. मात्र या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आता पुणे विद्यापीठाकडून स्टार्टअप सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना किंवा फर्म्सना ‘सीड फंड’ दिला जाणार आहे; तशी घोषणा पुणे विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

‘पुणेकर न्यूज’या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले (Startup Trend) पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटींचा सीड फंड प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाकडून गरजू स्टार्टअप्सना हा सीड फंड दिला जाणार आहे.

SPPU Research Park Foundation काय करते? (Startup Trend)

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ही संस्था या माध्यमातून स्टार्टअप ना मार्गदर्शन करते.
  • नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअप ना निधी (Startup Trend) उपलब्ध करुन देणे आदी विषयात काम करते.
  • केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड स्कीम’ च्या माध्यमातून फाऊंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे.
  • चांगल्या स्टार्टअप ना बळ मिळावे यासाठी फाउंडेशनने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.

पहा, फंड कोणाला मिळणार

  • या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, ग्रुप किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत.
  • ज्यांच्याकडे स्टार्टअपची उत्तम (Startup Trend) आयडिया आहे अशी कंपनी ग्रुप किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकतील.
  • Concept, Production Development, Production Chaining, Market Entry and Commercialization या विभागातील स्टार्टअप्सना हे फंड उपलब्ध होणार आहेत.
  • हे फंड मिळवण्यासाठी इतर पात्रतेच्या अटी काय आहेत हे https://seedfund.startupindia.gov.in/ या वेबसाईटला भेट दिल्या नंतर समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *