December 23, 2024
india-post-recruitment-2022-for-10th-pass-candidates/

भारतीय टपाल विभागात 10 वी पास उमेदवारांना (India Post Recruitment 2022) नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. टपाल विभागाने कार ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि तुमच्यात कार चालकाच्या पदावर काम करण्यासाठी लागणारी पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही नोकरी सरकारी असल्याने 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे.

विभाग – भारतीय टपाल विभाग (India Post Recruitment 2022)

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – कार चालक

पद संख्या – 24 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – indiapost.gov.in

आवश्यक पात्रता – (India Post Recruitment 2022)

  • भारतीय टपाल विभागात ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हींगचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवाराला कमीत कमी ३ वर्षे हलकी व जड वाहने चालवण्याचा अनुभव हवा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – (India Post Recruitment 2022)

वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सेवा क्रमांक – 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – indiapost.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *