कठोर परिश्रम करून, अडचणी आणि (IAS Success Story) अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे हाती येतं ते यश अनमोल असतं. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अधिकारी अनिल बसाक यांची, ज्यांनी जिद्द आणि समर्पणाने यशाचे शिखर गाठले आहे. ही कथा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका मुलाची; जो इतर मुलांना मिळणाऱ्या आरामदायी सोयी-सुविधांपासून वंचित होता; तरीही तो आपल्या ध्येयापासून मागे हटला नाही.
वडील सायकलवरून कपडे विकायचे
अनिल यांचे वडील बिनोद बसाक हे मूळचे बिहारमधील किशनगंजचे रहिवासी आहेत. त्यांनी जेमतेम चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, परंतु त्यांनी आपल्या चारही मुलांना स्वतःला मिळू न शकलेले उत्तम शिक्षण दिले. ते सायकलवरून गावोगावी फिरुन कपडे विकायचे. त्याआधी ते राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथे एका व्यावसायिकाकडे हाऊस हेल्पर म्हणून काम करत होते. यावरुन तुमच्या लक्षात येईल की त्यांना किती बिकट आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे याविषयी.
महागडे कोचिंग क्लास अन् सुविधांची गरज भासली नाही (IAS Success Story)
अनेकांना असे वाटते की UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महागडे कोचिंग क्लास, प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आणि चांगल्या सुविधा आवश्यक आहेत. पण समाजात असेही अनेक IAS/IPS अधिकारी आहेत; ज्यांनी कोणत्याही विशेष सुविधांशिवाय स्वतःचा करिअरचा मार्ग भक्कमपणे तयार केला आहे. त्यापैकीच एक आहेत IAS अनिल बसाक. यांची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल.
IIT इंजिनिअर आहेत अनिल
अनिल बसाक यांचा जन्म २ ऑगस्ट १९९५ रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी ओरिएंटल पब्लिक स्कूल, किशनगंज येथून आठवीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर 10 वी अररिया पब्लिक स्कूलमधून पूर्ण केली. 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनिल बसाक यांनी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा कल सरकारी नोकरीकडे झुकू (IAS Success Story) लागला. त्यामुळे त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2 वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये UPSC प्रिलिम्सची परीक्षा दिली पण यामध्ये ते नापास झाले.
नोकरीतून रजा घेवून केला अभ्यास
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनिल यांनी दुसऱ्यांदा परीक्षेचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी 616 वी रॅंक मिळवली आणि त्यांना IRS पद मिळाले. ते सरकारी नोकरीत रुजू झाले खरे; पण यावर ते समाधानी नव्हते. त्यांनी 1 वर्षाची रजा घेतली आणि 2020 मध्ये पुन्हा UPSC च्या परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या दोन परीक्षांचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे यावेळी त्यांनी निकालात कमालच केली. अनिल यांनी या परिक्षेत संपूर्ण भारतातून 45 वा क्रमांक मिळवला आणि IAS पदावर आपलं नाव कोरलं. सध्या ते नालंदामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.