December 23, 2024

 तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (Income Tax Department Recruitment 2024) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 10 ते 12 हजार पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होईल; अशी माहिती आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते; अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 10 ते 12 हजार पदे भरली जाणार आहेत; त्यामुळे आयकर विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया बंपर भरती समजली जाते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी म्हणावी लागेल.

करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा
नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार (Income Tax Department Recruitment 2024) आहेत. यामध्ये १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो.

निवडणूक काळात रोकड जप्तीच्या प्रमाणात वाढ होते (Income Tax Department Recruitment 2024)
नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान रोकड जप्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये १,७६० कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले, जे मागील निवडणुकीपेक्षा ७ पट जास्त होते. २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान जप्तीचे प्रमाण ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *