SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर एनिटाईम चॅनल (सीएमएस एसी) आमि सपोर्ट ऑफिसर- एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदांना भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी आज म्हणजेच १८ मेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीप्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्याची तारीख – १८ मे २०२२ ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ७ जून २०२२ –
या भरती प्रक्रियेतून भरली जाणारी रिक्त पदे
-> चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) – ५०३
-> चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीओएमएस-एसी) – १३०
-> सपोर्ट ऑफिसर – एनिटाइम चॅनल्स (एसओ-एसी)- ८
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेली संबंधित पात्रता असली पाहिजे.
वेतनश्रेणी
-> चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) -३६ हजार दरमहा
-> चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीएमएस-एसी) – ४१ हजार रुपये दरमहा
-> सपोर्ट ऑफिसर- एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) ४१ हजार रुपये दरमहा
वयोमर्यादा
उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ६० वर्षे असली पाहिजे.