देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन (Educational Budget 2024) यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. देशातील वैद्यकीय व्यवस्थेबाबत अर्थसंकल्पात म्हटले होते की, देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढतील. याशिवाय सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, NEP परिवर्तनात्मक सुधारणा सुरू करत आहे. पीएम श्री शाळा दर्जेदार शिक्षण देत आहे. स्किल इंडियाने 1.8 कोटी तरुणांना प्रशिक्षित केले आहे, 54 लाख तरुणांना प्रगत आणि री-स्किल केले आहे आणि 3,000 नवीन ITI स्थापन केले आहेत. मोठ्या संख्येने HEIs, म्हणजे 7 IITs, 16 IIITs, 7 IIMs, 16 AIIMS आणि 390 विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत.
2047 पर्यंत देश विकसित करणार
आमचे सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे. अर्थमंत्री म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत आर्थिक विकास झपाट्याने झाला आहे. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. मत्स्य संपदा योजनेमुळे 55 लाख लोकांना नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे. (Educational Budget 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणेसोबत आणखी एक नारा जोडला आहे आणि तो म्हणजे जय संशोधन. म्हणजे जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन. त्यासाठी देशात संशोधनाला चालना दिली जाणार आहे. 1 लाख कोटी रुपयांचा निधी 50 वर्षांसाठी बिनव्याजी दिला जाईल. त्याचा उद्देश संशोधनाला चालना देणे हा आहे. खासगी क्षेत्राला चालना मिळेल. संरक्षणावर भर असेल.
उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढला (Educational Budget 2024)
सितारमन पुढे म्हणाल्या; उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग 10 वर्षात 28 टक्क्यांनी वाढला आहे. STEM अभ्यासक्रमांमध्ये मुली आणि महिलांची नोंदणी 43 टक्के आहे, जी जगातील सर्वाधिक टक्केवारी आहे.