Maharashtra Police Force Recruitment 2025 : मोठी बातमी! महाराष्ट्र पोलिस दलात मेगा भरती, पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल इतक्या जागा…

Maharashtra Police Force Recruitment

Maharashtra Police Force Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न आता अनेकांचे पूर्ण होणार आहे. पोलिस दलात मेगा भरती राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही खरोखरच मोठी संधी आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील तरूण पोलिस भरतीची वाट पाहत होते. आता शेवटी पोलिस भरतीबद्दल सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. ज्यामुळे पोलिस होण्याचे अनेकांचे स्वप्न पुर्ण होईल. गृहविभागाने महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी दिली आहे. पोलिस भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या तरूणांसाठी गोड बातमीच म्हणावी लागणार आहे. अनेक दिवसांपासून भरतीचा सराव मुले करत होती. मात्र, भरतीबद्दल सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नसल्याने सर्वजण चितेंत होते.

महाराष्ट्र पोलिस दलात ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. पोलिसांच्या 15,000 पदांसाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. सध्या भरतीसाठी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून अर्ज करण्याची तारीख आणि बाकी सर्व प्रक्रियांची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

महापालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरची ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी एक चर्चा आहे. 15,000  जागांसाठी लाखांच्या घरात उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता आहे. यासोबतच या मंत्रिमंडळ बैठकीत अजूनही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आली आहेत. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलीये. रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा हा अजून सुटलेला नाहीये.

त्यामध्ये आता 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजावंदन होणार असल्याने भरत गोगावले हे नाराज झाले असून ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. उलट ते दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे हे श्रीनगरच्या दाैऱ्यावर असल्याने ते व्हिडीओच्या माध्यमातून या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते. पोलिस भरतीच्या निर्णयामुळे तरूणांना मोठा दिलासा हा नक्कीच मिळाला आहे. शासनाकडून भरती प्रक्रियेची अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *