December 23, 2024
Police Academy Convocation

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये दीक्षांत संचलन समारंभात 171 अधिकारी (Police Academy Convocation) पोलीस दलात दाखल झाले. सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. परीक्षा, मेहनत आणि आता सेवेत दाखल झाल्याने प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

‘आव्हाने पेलण्यासाठी तयार राहा’
सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पोलीस दलाकडून जनतेच्या आणि सरकारच्या अपेक्षा वाढत आहेत. नवी आव्हाने समोर येत आहेत. तेव्हा या सगळ्यासाठी तयार रहा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले आहे.

171 नवे PSI सेवेत दाखल (Police Academy Convocation)
यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. जवळपास 160 पुरूष आणि 11 महिला असे एकूण 171 नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश यामध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सोहळयास उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘हे’ आहेत बेस्ट कॅडेट

सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. तर सोलापूरची उर्मिला खोतला बेस्ट ऑलराउंडर कॅडेट म्हणून पुरस्कार मिळाला. तर सुजित पाटील याची दुसरा बेस्ट स्टडीज कॅडेट म्हणून निवड झाली.

असे असते प्रशिक्षण
प्रशिक्षणाच्या काळात प्रशिक्षणार्थींना कठोर मेहनत घ्यावी लागते. या दरम्यान (Police Academy Convocation) भावी अधिकाऱ्यांना भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांचा अभ्यास करावा लागतो. तसेच फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार हा साहसी सराव पूर्ण करावा लागतो.

उत्तीर्ण झालेल्या 171 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण 2 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाले होते. 10 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थींपैकीं 68 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *