ठाणे महानगरपालिकेत १७७३ जागांसाठी भरती; कोणत्या पदांसाठी सर्वाधिक रिक्त जागा? | Thane Municipal Corporation Recruitment 2025

Thane Municipal Corporation Recruitment 2025:ठाणे महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड पदांसाठी मोठी भरती होणार आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय सेवांमध्ये एकूण १७७३ जागा भरायच्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : महाराष्ट्र मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती जाहीर झाली आहे. महापालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड ची रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीतून पालिकेच्या विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Thane Municipal Corporation Bharti 2025 : अर्जप्रक्रिया सुरू
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ नुसार, या जाहिरातीमधील पदे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकोष सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. या भरतीमधून एकूण १७७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजेच १२ ऑगस्ट २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. तर २ सप्टेंबर २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.



Thane MNC Bharti vacancy details: सर्वाधिक रिक्त जागा कोणत्या पदांसाठी?
ठाणे महापालिका भरतीमधून ६५ संवर्गाच्या एकूण १७७३ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा निमशासकीय सेवा (गट-क) संवर्गातील नर्स मिडवाईफ/ परिचारिका / स्टाफ नर्सच्या ४५७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर अग्निशमन विभागातील फायरमनच्या ३८१ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच याच विभागातील चालक/ यंत्रचालक पदाच्या २०७ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीतील सर्व पदांच्या रिक्त जागा, त्यांचा वेतनस्तर आणि वेतनश्रेणी लेखात पुढे देण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

Thane Municipal Corporation Bharti 2025 Exam Fees: ठाणे महानगरपालिका भरती परीक्षा शुल्क-
ठाणे महानगरपालिका भरती २०२५ मध्ये अमागास प्रवर्गासाठी १००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ०२ सप्टेंबर २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

भरतीबद्दलच्या महत्त्वाच्या सूचना –
१. भरती अर्ज वेळेत भरावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे.
२. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे.
३. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत / तपशिल तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा/ वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *